Friday, June 22, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥४३॥

॥ श्री मनाचे श्लोक ॥४३॥
मना सज्जना एक जीवीं धरावें।
जनी आपुलें हीत तूवां करावें॥
रघूनायकावीण बोलो नको हो।
सदा मानसीं तो निजध्यास राहो॥४३॥
अर्थ : -
रघूनायकाला आपलासा का करून घ्यावा ते समर्थ या श्लोकात सांगत आहेत .समर्थ सांगतात की हे मना ,तू यातुझे नरदेहात आला आहेस ,तू तुझे हित करून घे. तुझे हित कशात आहे ? आत्मज्ञान मिळवणे ,स्वरूपात विलीन होउन जाणे ,यातच तुझे हित आहे .नरदेहच हाच असा देहच आहे की जो विचार करू शकतो ,स्वहित कशात आहे याचा विचार करू शकतो .फक्त तृष्णा ,निद्रा ,व मैथून यासाठी हा नरदेह तुला मिळाला नाही ,तर तुला मिळाला आहे आत्मज्ञान मिळवण्याकरता ! त्यासाठी तुला चार पाय-या पार पादावायाचा आहेत .चार पाय-या आहेत १.श्रवण २. मनन ३ निदिध्यासन ४ आत्मसाक्षात्कार
त्यासाठी तूला मनाचा निश्चय करायला हवा .परमार्थ मार्ग धरायला हवा .समर्थ म्हणतात : श्रवणापरीस मनन थोर | मनने कळे सारासार | निजध्यासे साक्षात्कार | नि :संग वस्तू || ११ -१ -४१ | |श्रवणा ला परमार्थात सर्वश्रेष्ठ स्थान आहे .कोणतीही गोष्ट कळण्यासाठी श्रवण करावे लागते .लहानपणी लहान मुले श्रवणातून ऐकतात ,मग बोलतात ,माणसे ओळखतात .तसे साधकाला श्रवणातून च साधकावस्थेतून सिध्दावस्थेत जाण्यासाठी श्रवण करावे लागते गुरुमुखातून ! गुरुमुखातून श्रवण करता आले नाही ,तर गुरूने लिहिलेले ग्रंथ वाचणे हे सुध्दा श्रवण च आहे .श्रवण करताना काय ऐकावे व काय ऐकू नये हे महत्वाचे आहे ,श्रवण फक्त पारमार्थिक तत्वांचे असावे .
श्रवणाची दुसरी पायरी आहे मनन ! श्रवण केले पण ऐकलेले लक्षात ठेवले नाही ,त्याचे चिंतन केले नाही ,तर त्याचा काही उपयोग नाही .त्यासाठी ,मनन जरूर आहे .मननाने एखादा चांगला विचार मनात ठसतो .मननाची व्याख्या आहे : या नाव जाणावे मनन | अर्थालागी समाधान | | मननाने ऐकलेल्याचा अर्थ कळतो .संशय नाहीसा होतो .मनाची चंचलता नाहीशी होते .बुद्धीला निश्चयाचे स्वरूप प्राप्त होते .
पुढची पायरी आहे निदिध्यासन ! श्रवण ,मनन केले तरी स्वस्वरूपाचे ,सद्वस्तूचे विस्मरण होउ नये म्हणून निदिध्यास हवा .
श्रवणाने ,मननाने रघुरायाचे स्वरूप तेच मी असा मनाचा निश्चय झाला की त्याचा ध्यास धरावासा वाटतो .मग स्वरूप साक्षात्कार होतो

No comments:

Post a Comment