Friday, June 22, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥४४॥

॥ श्री मनाचे श्लोक ॥४४॥

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी।
कथा आदरे राघवाची करावी॥
नसें राम ते धाम सोडूनि द्यावे।
सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥४४॥

अर्थ : - मागील श्लोकात सांगितलेला स्वरूपाचा अखंड ध्यास कसा धरावा ते सांगताना समर्थांनी मौन्य मुद्रा धरायला सांगितली आहे .मौन्य मुद्रा म्हणजे काय असा प्रश्न येतो .मौन्य मुद्रा म्हणजे फक्त वैखरीने बोलायचे नाही असे आहे का ?मौन्यमुद्रा म्हणजे केवळ वैखरीने न बोलणे नाही .आपण मुखाने बोललो नाही तरी तरी मनात संकल्प ,विकल्प ,विचारांचे तरंग उठतच असतात .मनात आपण अशा लोकांशी मनात भांडत असतो ज्यांच्याशी आपल्याला प्रत्यक्ष भांडता येत नाही .तेच आपण मौनात विचार करत असतो .नुसतेच वैखरीने न बोलणे म्हणजे मौन्य मुद्रा नाही .
अखंड विचारांचे तरंग असणा-या आपल्या मनाला बोलल्या शिवाय चैन पडत नाही .त्यासाठी समर्थांनी वायफळ न बोलता मोजकेच बोलायला सांगितले आहे .बोलत नसतांना राघवाचे नाव घ्यायालां सांगितले आहे .मौनं सर्वार्थ साधनं |असे म्हटले आहे .मौनात अंतर्मुख होतानां शेवटी स्वरूप साक्षात्काराचा धनी होता येते .
शेवटी जेथे राम गायला जात नाही तेथे राहू नये असे समर्थ सांगतात

No comments:

Post a Comment