Friday, June 22, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥४३॥

॥ श्री मनाचे श्लोक ॥४३॥
मना सज्जना एक जीवीं धरावें।
जनी आपुलें हीत तूवां करावें॥
रघूनायकावीण बोलो नको हो।
सदा मानसीं तो निजध्यास राहो॥४३॥
अर्थ : -
रघूनायकाला आपलासा का करून घ्यावा ते समर्थ या श्लोकात सांगत आहेत .समर्थ सांगतात की हे मना ,तू यातुझे नरदेहात आला आहेस ,तू तुझे हित करून घे. तुझे हित कशात आहे ? आत्मज्ञान मिळवणे ,स्वरूपात विलीन होउन जाणे ,यातच तुझे हित आहे .नरदेहच हाच असा देहच आहे की जो विचार करू शकतो ,स्वहित कशात आहे याचा विचार करू शकतो .फक्त तृष्णा ,निद्रा ,व मैथून यासाठी हा नरदेह तुला मिळाला नाही ,तर तुला मिळाला आहे आत्मज्ञान मिळवण्याकरता ! त्यासाठी तुला चार पाय-या पार पादावायाचा आहेत .चार पाय-या आहेत १.श्रवण २. मनन ३ निदिध्यासन ४ आत्मसाक्षात्कार
त्यासाठी तूला मनाचा निश्चय करायला हवा .परमार्थ मार्ग धरायला हवा .समर्थ म्हणतात : श्रवणापरीस मनन थोर | मनने कळे सारासार | निजध्यासे साक्षात्कार | नि :संग वस्तू || ११ -१ -४१ | |श्रवणा ला परमार्थात सर्वश्रेष्ठ स्थान आहे .कोणतीही गोष्ट कळण्यासाठी श्रवण करावे लागते .लहानपणी लहान मुले श्रवणातून ऐकतात ,मग बोलतात ,माणसे ओळखतात .तसे साधकाला श्रवणातून च साधकावस्थेतून सिध्दावस्थेत जाण्यासाठी श्रवण करावे लागते गुरुमुखातून ! गुरुमुखातून श्रवण करता आले नाही ,तर गुरूने लिहिलेले ग्रंथ वाचणे हे सुध्दा श्रवण च आहे .श्रवण करताना काय ऐकावे व काय ऐकू नये हे महत्वाचे आहे ,श्रवण फक्त पारमार्थिक तत्वांचे असावे .
श्रवणाची दुसरी पायरी आहे मनन ! श्रवण केले पण ऐकलेले लक्षात ठेवले नाही ,त्याचे चिंतन केले नाही ,तर त्याचा काही उपयोग नाही .त्यासाठी ,मनन जरूर आहे .मननाने एखादा चांगला विचार मनात ठसतो .मननाची व्याख्या आहे : या नाव जाणावे मनन | अर्थालागी समाधान | | मननाने ऐकलेल्याचा अर्थ कळतो .संशय नाहीसा होतो .मनाची चंचलता नाहीशी होते .बुद्धीला निश्चयाचे स्वरूप प्राप्त होते .
पुढची पायरी आहे निदिध्यासन ! श्रवण ,मनन केले तरी स्वस्वरूपाचे ,सद्वस्तूचे विस्मरण होउ नये म्हणून निदिध्यास हवा .
श्रवणाने ,मननाने रघुरायाचे स्वरूप तेच मी असा मनाचा निश्चय झाला की त्याचा ध्यास धरावासा वाटतो .मग स्वरूप साक्षात्कार होतो

राम मंत्राचे श्लोक ||२१||

राम मंत्राचे श्लोक ||२१||

तुला येम पाशीं करी बद्ध जेव्हां |
सखा कोणता सोडवी सांग तेव्हां ||
यमाला कदापी दया ते न ये रे |
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||२१||

When Death will bind you in his grip,
Tell me what friend will release you,
Death shows never any compassion, mindful be
Only chant this simple prayer, Hare Rama ||21||

॥ श्री मनाचे श्लोक ॥४४॥

॥ श्री मनाचे श्लोक ॥४४॥

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी।
कथा आदरे राघवाची करावी॥
नसें राम ते धाम सोडूनि द्यावे।
सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥४४॥

अर्थ : - मागील श्लोकात सांगितलेला स्वरूपाचा अखंड ध्यास कसा धरावा ते सांगताना समर्थांनी मौन्य मुद्रा धरायला सांगितली आहे .मौन्य मुद्रा म्हणजे काय असा प्रश्न येतो .मौन्य मुद्रा म्हणजे फक्त वैखरीने बोलायचे नाही असे आहे का ?मौन्यमुद्रा म्हणजे केवळ वैखरीने न बोलणे नाही .आपण मुखाने बोललो नाही तरी तरी मनात संकल्प ,विकल्प ,विचारांचे तरंग उठतच असतात .मनात आपण अशा लोकांशी मनात भांडत असतो ज्यांच्याशी आपल्याला प्रत्यक्ष भांडता येत नाही .तेच आपण मौनात विचार करत असतो .नुसतेच वैखरीने न बोलणे म्हणजे मौन्य मुद्रा नाही .
अखंड विचारांचे तरंग असणा-या आपल्या मनाला बोलल्या शिवाय चैन पडत नाही .त्यासाठी समर्थांनी वायफळ न बोलता मोजकेच बोलायला सांगितले आहे .बोलत नसतांना राघवाचे नाव घ्यायालां सांगितले आहे .मौनं सर्वार्थ साधनं |असे म्हटले आहे .मौनात अंतर्मुख होतानां शेवटी स्वरूप साक्षात्काराचा धनी होता येते .
शेवटी जेथे राम गायला जात नाही तेथे राहू नये असे समर्थ सांगतात

श्री मनाचे श्लोक

॥ श्री मनाचे श्लोक ॥३२॥

अहल्या शिळा राघवें मुक्त केली।
पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥
जया वर्णितां शीणली वेदवाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३२॥

अर्थ : - श्रीरामसामर्थ्याच्या पराक्रमगाथेमध्ये अहिल्येचे उदाहरण गाजलेले आहे. या कथेला वैयक्तिक, सामाजिक, तसाच आर्थिक आशयही आहे. हे तिन्हीही अर्थ राम-सामर्थ्य दाखवितात. पहिल्या आशयात गौतमाची पत्नी अहिल्या हिच्या संकटमुक्तीचे उदाहरण आहे. गौतम ऋषींची ही पत्नी इंद्राच्या मोहाला बळी पडली. गौतममुनी आश्रमात नसताना गौतमाचेच रूप घेऊन इंद्राने अहिल्येला फसविले. परत आल्यावर गौतमाने इंद्रालाही शाप दिला व अहिल्येलाही शाप दिला. त्यामुळे अहिल्या शिळा होऊन पडली. श्रीराम विश्वामित्राबरोबर मिथिलेला जात असताना विश्रामित्राने अहिल्येच ती कथा श्रीरामाला सांगितली आणि श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिल्या पुन्हा जिवंत झाली. या कथेचा दुसरा आशय असा की पापी माणसाला राम सामर्थ्य दूर ठेवीत नाही, तर त्याला पुण्यमार्गाने आणण्याचे प्रयत्न करते. या कथेचा तिसराही एक आशय आहे. तो आर्थिक आणि काहीसा रूपकात्मक आहे. अहिल्याचा अर्थ ‘न नांगरलेली जमीन’ असाही होतो. श्रीरामासारखा समर्थ पुरूष ज्या प्रदेशातून जातो, तो प्रदेश घातक जनावरांच्यापासून मुक्त होणार हे उघड आहे. प्राचीन काळी वस्ती अशीच वाढली. धैर्यवान पुरूष जंगलात दुर्गम भागात गेले. मग तेथे वस्ती झाली. मग लागवड झाली. समाजाची अर्थार्जनशक्ती वाढली. माणसे अधिक निर्भय, बलवान, समृध्द झाली. या अर्थानेही रामाचे पाय जेथे लालगे, त्या प्रदेशांचा उध्दार झाला असला पाहिजे. हा तिसरा अर्थही श्रीरामाचे समर्थपण सांगतो.

Kalyan Swami

Early life

In the 17th century, Kishnajipant Kulkarni from Babhulgaon district Nashik traveled on a pilgrimage in Maharashtra. When he came to Kolhapur, the holy place of Sri Mahalakshmi, he married the sister of Parajipant Kulkarni (her name is unknown). They had three children (Ambaji, Dattatreya, and a daughter). After their birth their father, Krishnajipant, resumed his pilgrimage. At this time, Ambaji, Dattatreya, and their sister and mother were living at Kolhapur with brother Parajipant.

Samarth Ramdas Swami was in Kolhapur, performing kirtans in the Sri Mahalakshmi temple. Parajipant with his sister and her children always went to observe the kirtans. He asked Samarth Ramdas Swami to give him Diksha. Parajipant asked Samarth for gurudakshina, then Samarth asked Ambaji about his religious work. After this incident Ambaji, Dattatray and their mother went with Samarth Ramdas Swami. During their travels Samarth told Dattaray Swami to stay at Shirgaon. Only Ambaji went with Samarth Ramdas Swami.
Samarth Ramdas Swami and Kalyan Swami

Eventually, Ambaji became the favorite disciple of Samarth and took the name Kalyan Swami. Kalyan Swami spent the 30-year period 1648 to 1678 with Samarth. Every day Kalyan Swami brought water to bathe Samarth Ramdas Swami from the river Urmodi in large copper pots. These copper pots are now at Sajjangad. In 1678 Samarth told him to go to Domgaon for the work of Lord Ram.

During this period Kalyan Swami transcribed the literature of Samarth Ramdas Swami. Together they completed the book Dasbodh in Shivthar Ghal, Manache Shlok and others. The books take the form of conversation between guru and shishya. Samarth's other writings were written by Sri Kalyan Swami. 250 of Kalyan swami's handwritten texts are available at Dhule.
Literature

    Soliv Sukh
    Mahavakya Panchikaran
    Dhruv Aakhyan
    Rukmini Swayamvar

Personality

He practised 1200 Surynamaskar daily. His body was reportedly very strong. Kalyan was called 'yogiraj' by devotees. His sketch is in 'yogmudra'. He wore garments such as kundals, bhasma and mudrika. Kalyan established more than 250 "maths" in the area of Maharashtra, Karnataka and Andra Pradesh.
Death

Kalyan Swami died on Aashadh Shuddh Trayodashi in 1714 at Paranda district Dharashiv (Osmanabad). His funeral was held at Domgaon near Paranda. The ashes of Samarth Ramdas Swami and Kalyan Swami were mixed by Keshav Swami after his death.
Samadhi Temple

The Samadhi temple of Shri Kalyan Swami at Domgaon is 250 years old. It harbors an original copy of 'Dasbodh' which is said to be by Samarth Ramdas Swami and scribed by Sri Kalyan Swami. Chanting 'Mala' is preserved there.
Disciplies

    Mudgal Swami-Successor Domgaon Math
    Jagannath Swami-Tadawale Math
    Keshav Swami-Umbraj Math
    Ramjibova Baramatikar
    Haribova Bhoomkar
    Purushottam Swami

References

    Samarthshishya Kalyan Swami by Ganesh Shankar Dev, Stakaryottejak Sabha, Dhule.
    Dasayan by Shri.Ananatdas Ramdasi

Disciples



Samarth Ramdas had many disciples.Kalyan Swami worked as a writer for Ramdas, recording his songs and prayers. Ramdas tested him in many ways before giving him this responsible position. Other noteworthy disciples included

    Kalyan Swami
    Udhhaw Swami
    Vena Swami
    Akka Bai
    Bhim Swami
    Diwakar Swami
    Dinkar Swami

He is considered as the guru of Chhatrapati Shivaji Maharaj. It is said that Shivaji Maharaj requested Shri Ramdas swami to move his residence to a fort named Parali & establish his permanent monastery there. The fort was subsequently renamed Sajjangad (सज्जनगड) - Fort of the sacred.[3]

In the 20th century, Nana Dharmadhikari undertook to spread the philosophy of Samarth Ramdas.

Writings



Ramdas Swami was a gifted composer. He produced considerable literature in verse form in Marathi. Among his works, two compositions particularly stand out: A small book of meditations, Shri Manāche Shlok, advises ethical behaviour and love for God, and a large volume, Dasbodh, provides advice on both spiritual and practical topics. Apart from Dasbodh, Ramdas also wrote the Shri Māruti Stotra, a poem in praise of Hanuman, the AatmaaRaam, 11-Laghu Kavita and Raamayan (Marathi-Teeka).

His most popular composition is the Marathi song/prayer to Lord Ganesh Sukhkartā Dukhhartā Vārtā Vighnāchi. He also composed several other prayers such as Satrane Uddane Hunkaar Vadani to Lord Hanuman and Panchanan haivahan surabhushan lila to Lord Khandoba.

Residences

Ramdas moved around quite a lot, and in the process, used several Ghal (Marathi: घळ), which are small caves used for meditation. The famous ones include:
    Ramghal, on Sajjangad
    Morghal, at Morbag village near Sajjangad
    Tondoshi Ghal, North of Chaphal
    TaakLi, near Nashik
    Chandragiri, opposite Vasantgad, near Karad
    Helwak, near Helwak village
    Shiganwadi, near Chandragiri
    Shivthar Ghal, near Mahad